Type to search

नंदुरबार

जितेंद्र पाटील यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन

Share

नंदुरबार । तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथील चिराईमाता माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक जितेंद्र प्रताप पाटील यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथील चिराईमाता माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक जितेंद्र प्रताप पाटील (41) रा.खर्दे-खुर्दे ता.जि.नंदुरबार यांचे दुख:द निधन झाले आहे. मागील 4 वर्षात नातूचा पगार आपल्या डोळ्या देखत सुरू होईल याची वाट बघत-बघत जितेंद्र प्रताप पाटील यांची आजी व नंतर आजोबाही वारले,

त्यानंतर मुलाचा पगार लवकर सुरू व्हावा याची चिंता करत त्यांचे वडीलांचे निधन झाले आणि आता शेवटी स्वत: अल्प पगाराच्या विवंचनेत अनुदान वाढीची वाट पहात-पहात शिक्षक जितेंद्र पाटील यांचेही निधन झाले.ही वारले, शासनाच्या धोरणाचे पाटील कुटुंबीय बळी ठरले आहेत.शिक्षण क्षेत्रात मागील 15 वर्ष विनावेतन सेवा करित असतांना, आता अल्प वेतनाची विवंचना व तणावातुन ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू ओढवला असुन, यांस संपुर्णत: शासन जबाबदार आहे. शासनाच्या निंदनीय धोरणाचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो.असे स्वाभीमानी शिक्षक संघटनेने म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!