जितू भाटिया खून प्रकरण : पत्नी हेमासह प्रियकरास जन्मठेप

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितू भाटिया खून प्रकरणी मुख्य आरोपी असलेली त्याची पत्नी दिव्या उर्फ हेमा व तिचा प्रियकर शप्पु उर्फ प्रदीप कोकाटे (रा. सिद्धार्थनगर) या दोघांना नगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच हत्या करण्यासाठी शस्त्र पुरविणार्‍या गोट्या उर्फ विक्रम बेरड यास चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील मोहन ट्रंक डेपोचे मालक जितू भाटिया खून प्रकरणी मुख्य आरोपी असलेली त्याची पत्नी दिव्या उर्फ हेमा व तिचा प्रियकर शप्पु उर्फ प्रदीप कोकाटे (रा. सिद्धार्थनगर) या दोघांना नगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच हत्या करण्यासाठी शस्त्र पुरविणार्‍या गोट्या उर्फ विक्रम बेरड यास चार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.2013 मध्ये जितू भाटीया हे त्यांच्या कापडबाजारातील मोहन ट्रंक डेपो या दुकानात काम करीत असताना प्रदीप कोकाटे याने दुकानात जाऊन त्यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या होत्या. गोळ्या झाडताना तोंडाला काळे फडके बांधले असल्याने कोकाटेपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना एक महिन्याचा कालावधी लागला होता. या दरम्यान जितू भाटीया यांच्या कुटूंबियांकडे 50 लाख  रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे हा प्रकार एखाद्या खंडणीबहाद्दराने केला असावा असा संशय व्यक्त केला गेला. प्रतिष्ठीत व्यापार्‍याची खंडणीसाठी भर बाजारात हत्या झाल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. जितू भाटीया यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास व्यापार्‍यांनी नकार दिला होता. शहरातील लोकप्रतिनिधींनी पोलिसांना धरेवर धरले होते. त्यामुळे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी शहरातील काही संशयीत आरोपी ताब्यात घेतले होते. शहरात मोर्चे आंदोलने यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.
दरम्यान प्रदीप कोकाटे याने भाटीया कुटुंबियांना वारंवार फोन करुन पैशाची मागणी केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढत चालले होते. 20 दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या नाट्यमय प्रकाराचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक ढेकणे, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, उमेश खेडकर, प्रसाद भिंगारदिवे, जोसेफ साळवी, राकेश खेडकर यांच्या पथकाने कोकाटेला तारकपूर परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला.
शनिवारी (दि.17) या खटल्याची अंतीम सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने तपासलेले साक्षीदार, वैद्यकीय अहवाल, जप्त पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सरकार पक्षाचे वकील अनिल घोडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दिव्या उर्फ हेमा भाटीया व प्रदीप कोकाटे या दोघांना जन्मठेप तर हत्येसाठी पिस्तूल पुरविणार्‍या विक्रम बेरडला चार वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

दिव्या भाटीया व प्रदीपचे जवळचे ‘संबंध’ असल्याचे त्याने सांगितले. जितु भाटीया यांना या ‘संबंधा’ची कुणकुण लागल्याने तो पत्नी हेमा हिला मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी व प्रदीप कोकाटे यांनी कट रचून भाटीया यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. हत्या करण्यासाठी प्रदीपने विक्रम बेरड या सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल घेतल्याचे कोकाटेने सांगितले होते.

LEAVE A REPLY

*