जिंकण्याच्या तीव्रतेवर यश अवलंबून

0
जळगाव  / दुसर्‍यांवर प्रेम करण्या अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जे स्वतःवर प्रेम करतात तेच यशस्वी होतात.
यशासाठी नेमके ध्येय ठरवले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. जिंकण्याची तीव्रता जेवढी जास्त तेवढेच अधिक यश मिळते असे प्रतिपादन नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
दर्जी फाऊंडेशनतर्फे कांताई सभागृहात यशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उद्योजक श्रीराम पाटील होते.

तसेच व्यासपिठावर प्रमुख वक्ते म्हणून नितीन बानगुडे पाटील, गोपाल दर्जी, प्रांजल पाटील, सौरभ सोनवणे, कुलदिप सोनवणे, निलम बाफना आदी उपस्थित होते.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करतांना बानगुडे पाटील म्हणाले की, जगात अशक्य काहीच नाही.

प्रत्येक जण युनिक असतो त्यामुळे आपली स्पर्धा आणि तुलना केवळ स्वतःशीच असते असे मत त्यांनी व्यक्त केले. हिमाचलमधील डोंगर फोडणारा मांझी, बारामतीच्या मॅरेथॉनमध्ये पतीच्या इलाजासाठी धावणारी 65 वर्षांची वृध्दा, इंग्रजी न शिकता मंदिराबाहेर हॉटेल टाकणार्‍या इसमाची गोष्ट सांगून श्री. पाटील यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.

त्यानंतर युपीएसएसी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी व पालकांचा मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदिप पाटील यांनी केले. तर आभार रामकृष्ण करंके यांनी मानले.

मनात न्युनगंड नको – प्रांजल पाटील
माणसाला यश मिळावायचे असेल तर त्याला अपयश मिळतच असते. त्यांनी ठरविलेले ध्येय साध्य होईपर्यंत त्याने ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवली पाहिजे. ठरविलेल्या क्षेत्रात पुढे जायचे असल्यास माणसाच्या मनात न्युनगंड नको. मनात न्युनगंड असल्यास माणासला नेहमी अपयशाला सामोरे जावे लागत असल्याचे मत प्रज्ञाचक्षू प्रांजल पाटील हीने व्यक्त केले.

आत्मविश्वास महत्वाचा- निलम बाफना
स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मला प्रज्ञाचक्षू प्रांजल पाटील यांच्याकडून मिळाली. व त्यांनंतर माझ्यातला आत्मविश्वास वाढल्याने मी 2014 पासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असतांना एमपीएससी मार्फत मी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचले असल्याचे बाफना यांनी सांगीतले.

शिक्षणात लोभी असणे गरजेचे- अभ्युदय साळुंखे
माणसाला ध्येय गाठण्यासाठी त्याच्याजवळ इच्छाशक्ती असणे अत्यंत आवश्यक असून त्यावर तो कोणत्याही अडचणींवर मात करु शकतो. तसेच स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करतांना स्वत:वर विश्वास ठेवून अभ्यास करावा व शिक्षण घेत असतांना प्रत्येकाने लोभी असणे गरजेचे असल्याचे आवाहन अभ्युदय साळुंखे यांनी केले.
अपयशावर विचार करु नका – सौरभ सोनवणे
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असतांना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मप्रेरणा असणे गरजेचे असून त्याला परिक्षेत मिळालेल्या अपयशावर जास्त विचार न करता यशाकडे वाटचाल करणे अत्यंत आवश्यक असते. तसेच परिक्षेत झालेल्या खुप काही शिकत असल्याचे मत सौरभ सोनवणे यांनी व्यक्त केले.

यांचा झाला गौरव
प्रांजल पाटील, डॉ. सौरभ सोनवणे, अभ्युदय साळुंखे, निलम बाफना, संगिता महाजन, अमित चौरे, अनिता बागुल, भगवान पाटील, कृष्णा पाटील, लक्ष्मी सपकाळे, मुस्तफा मिर्झा, पंकज सपकाळे, सागर पाटील यांचा परिवारासह गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

*