Type to search

क्रीडा

जालंदरमध्ये मतदानासाठी हरभजन रांगेत

Share
जालंदर। क्रिकेटर हरभजन सिंह लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या फेरीत रविवारी पंजाबमधील जालंधरमध्ये सर्वांत प्रथम मतदान करणार्‍या मतदारांमध्ये सामिल राहिले. त्यांने मतदारांना मताधिकाराचा उपयोग करण्याची संधी न गमविण्याचे आवाहन केले.

मतदानानंतर हरभजनने मीडियाच्या समोर स्पष्ट केले की राजकारणात येण्याचा त्यांची कोणतीही योजना नाही. त्यांने म्हटले की राजकारणात यापूर्वी पासूनच अनुभवी लोक आहेत. त्यामुळे माझी कोणतीही योजना नाही.या आधी अशा बातम्या येत होत्या की भारतीय जनता पक्षाने अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी हरभजनशी संपर्क केला होता.

लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या फेरी अंतर्गत पंजाबमधील सर्व 13 लोकसभा मतदारसंघ आणि राजधानी चंदीगडमधील एकमेव लोकसभा मतदारसंघात रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान संपन्न झाले.यावेळी त्याने सर्व मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले. भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!