Type to search

नंदुरबार

जाम येथे प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे ‘एक घर एक झाड’ उपक्रम

Share

बामखेडा ता. शहादा । वार्ताहर – शहादा तालुक्यातील जाम या गावात प्राही जनहित फाऊंडेशनतर्फे ग्रामपंचायत कार्यलयात मोफत आरोग्य तपासणी व वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच सपन्न झाला.प्राही जनहित फाउंडेशन हे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत असून या फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबीर व एक घर एक झाड लावण्यात उपक्रम सुरू आहे.

तसेच ग्रामपंचायत जाम तर्फे गावात राज्य सरकार अंतर्गत 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.यात गावकर्‍यांना प्रत्येकी दोन वृक्ष देण्यात आली.त्यात एक वृक्ष प्राही जनहित फाउंडेशन यांच्यामार्फत व दुसरे ग्रामपंचायत जाम यांच्यामार्फत झाड देवून ते जगविल्यास ग्रामपंचायत तर्फे बक्षीस देण्यात येईल असे ग्रामपंचायत जाम कडुन या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांना बक्षीस बद्दल मार्गदर्शन केले.त्यात 2 झाडे जगविल्यास प्रथम बक्षीस 5 हजार रुपये व घरपट्टी-पानीपट्टी सूट (1वर्ष) दुसरे बक्षीस 2100 रुपये व घरपट्टी-पानीपट्टी सूट (1वर्ष) तिसरे बक्षीस 1100 रुपये व घरपट्टी-पानीपट्टी सूट (1वर्ष) असे तीन व्यक्तींना बक्षीस देण्यात येणार आहे. गावात झाडे जगविल्यास प्रत्येक लाभार्थींचे नावे लिहून 10 नावे (लकी ड्रॉ) पद्धतीने निवड करून त्यांची 1 वर्षाची घरपट्टी पानी पट्टी सूट करण्यात येईल.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंजी जयसिंग पावरा यांची प्रमुख उपस्थित होती.या कार्यक्रम प्रसंगी पावरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित असलेले सिताराम पावरा माजी सरपंच तोरणमाळ ,शांताराम खर्डे भूलाने, सरपंच ईश्वर दादा वाघ,ग्रामसेवक हेमंत पाटिल, मुख्याध्यापक तुषार पाटिल,डॉ.हेमंत बच्छाव प्राही जनहित फाऊंडेशन टिमचेगणेश मोहिते सर,प्रदिप चव्हाण, सुनिल सतवे,मणीलाल खर्डे मनोज ठाकरे,दिवान पावरा,हिम्मत पटले, दिनेश चव्हाण,पंडित पावरा,राकेश पावरा, गणेश पटले,ग्रा.प.सदस्य अनिल चव्हाण,ग्रा.प.सदस्य लखन चव्हाण, पोलिस पाटिल भीमराज चव्हाण, पोलिस पाटिल नवल चव्हाण,ग्रा.प. शिपाई रविंद्र पवार,ग्रा.रोजगार सेवक गणेश पाडवी,प्रशांत पवार,राजू चव्हाण, ज्ञानेश्वर पावरा,जि.प.शाळा विद्याार्थी सामाजिक कार्यकर्ता सुभाष वाघ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक तुषार पाटील यांनी केले तर आभार सुभाष वाघ यांनी मानले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!