जामनेरनजीक अपघातात तीन ठार

0

जामनेर / मध्य प्रदेशातील बहादरपुर येथून लग्न आटोपून जामनेरकडे बोदवडमार्गाने येणारी दुचाकी व समोरुन जामनेरकडून बोदवडकडे जाणार्‍या दुचाकींची जबर धडक होवून तीन जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना जामनेर-बोदवड रस्त्यावरील सिद्धगड भवानी फाट्यानजीक दि.4 रोजी सायंकाळी घडला.

 

लग्न आटोपून येणारे अर्जून रामदास माळी (वय 32), प्रल्हाद शामराव माळी (वय 60) व
मंजुळाबाई प्रल्हाद माळी असे तिघे जण दुचाकी क्र. (एम.एच.19.सी.एन.9476) ने टाकळीकडे (ता.जामनेर) बोदवडमार्गाने येत होते.

तर दुसरी दुचाकी क्र.(एम.एच.28.यू.7599)ने किसन चिमा शिंदे व जगदेव वासुदेव किटे हे दोघे जण जामनेरहून बोदवडकडे जात असताना सिद्धगड घाट चढताच दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यामध्ये अर्जून माळी व किसन शिंदे हे दोघे जागीच ठार झाले.

तर प्रल्हाद शामराव माळी हे जळगावला उपचाराला नेत असताना मयत झाले. तर मंजुळाबाई माळी व जगदेव किटे हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची घटना कळताच राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन, उपजिल्हा रुग्णालयात पोहचले.

मयतांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन जखमींच्या उपचाराविषयी डॉक्टरांशी चर्चा केली.

LEAVE A REPLY

*