Type to search

जाफर बांगलादेशचा फलंदाजी सल्लागार

क्रीडा

जाफर बांगलादेशचा फलंदाजी सल्लागार

Share
मुंबई । बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. वसीम जाफरची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मिरपूरमधल्या आपल्या अ‍ॅकेडमीमध्ये बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कैसर अहमद म्हणाले, मजाफरशी मिरपूरमध्ये बीसीबी अ‍ॅकेडमीचा फलंदाजी सल्लागार म्हणून मेपासून एप्रिल 2020 पर्यंतचा करार करण्यात आला आहे. आधी वसीम जाफर अंडर-16 आणि अंडर-19 टीमला प्रशिक्षण देईल. यानंतर बीसीबी त्याला हाय परफॉर्मन्स युनिटमध्ये बॅटिंग सल्लागार करण्याचा विचार करेल.

41 वर्षांचा वसीम जाफर बांगलादेशमध्ये युवा खेळाडूंसोबत 6 महिने घालवेल. जाफरने भारताकडून 31 कसोटी सामन्यांमध्ये 1,944 धावा केल्या. 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये जाफर भारताकडून खेळला.

स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम जाफरच्या नावावर आहे. जाफरने स्थानिक क्रिकेटमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या. तर मागच्या 2 रणजी मोसमात जाफर विदर्भाकडून खेळला. या दोन्ही मोसमात विदर्भाने 2 रणजी ट्रॉफी आणि 2 इराणी कप स्पर्धा जिंकल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!