जाणून घ्या! कोणाच्या जीवनावर असेल नागराज मंजुळेंचा आगामी बॉलीवूड सिनेमा! बिग बी साकारणार ही भूमिका

0
‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा नुकतीच झाली. विशेष म्हणजे नागराज, बिग बींबरोबर त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट करणार असल्याचेही समोर येत आहे.
नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट हा फुटबॉलच्या माध्यमातून गरीब किंवा झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलणाऱ्या विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती समोर येत आहे.
विजय बारसे हे फुटबॉल प्रशिक्षक असून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या जीवनात त्यांनी अनेक बदल घडवले आहेत.
त्यांच्याच जीवनावर आधारित असलेला आगामी चित्रपट नागराज करत असून त्यात बिग बी विजय बारसे यांची म्हणजे एका फुटबॉल कोचची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विजय बारसे मूळचे नागपूरचे असून त्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून गुंडगिरीत अडकलेल्या अनेक गरीब तरुणांना चांगल्या मार्गावर परत आणण्याचे काम केले आहे.
स्लम सॉकर नावाच्या संस्थेच्या मार्फत ते गरीब मुलांना मदत करतात.
बिग बी सध्या ‘102 नॉट आऊट’ आणि ‘कौन बनेगा करोडपती’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

LEAVE A REPLY

*