जाणून घ्या किती आहे सलमानच्या बॉडीगार्ड ‘शेरा’चा पगार?

0
बॉलिवूडचा सुपरस्‍टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये.
शेरा गेल्या वीस वर्षांपासून सलमानचा खास बॉडीगार्ड आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी शेरा किती पैसे आकारतो हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान शेराला दरमहिन्याला 15 लाख रूपये पगार देतो. म्हणजे शेरा वर्षाला तब्बल 2 कोटी रूपये कमावतो. शेराची स्वतःची सिक्युरिटी कंपनीही आहे.
सलमानसोबत जवळपास सर्वच कार्यक्रमांना शेरा असतो.  सलमान शेरासोबत आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच राहतो.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर सलमान लवकरच शेराच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. यापुर्वी आपला सुपरहीट सिनेमा ‘बॉडीगार्ड’ त्याने शेराला समर्पित केला होता.
कॅनडियन पॉप सिंगर जस्टीन बीबर नुकताच मुंबईत आला त्यावेळी बीबरनं स्वत:चे बॉडीगार्ड तर सोबत आणले होतेच. पण सोबतच त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी शेराकडेच देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*