जागरूक नागरिक मंचाच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा : पोलीस निरीक्षक परमार

0

संघटनेच्या कार्यालयाचे पोलीस निरीक्षक परमार यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नदीचा उगम हा छोट्या प्रवाहातून होत असतो. मात्र, त्याच नदीचे विशाल पात्रात रुपांतर होते. नगरच्या जागरुक नागरिक मंचाचेही असे आहे. आज छोट्या स्वरूपात असलेल्या जागरूक नागरिक मंचच्या कार्यात नागरिकांचा सहभाग वाढून पुढील काळात जागरूक मंचच्या कार्याचा विशाल वटवृक्ष व्हावा, असे गौरोद्गार कोतवाली पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरिक्षक अभय परमार यांनी काढले.

शहराच्या 527 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जागरूक नागरिक मंचच्या नवीनपेठेतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निरिक्ष परमार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्णी, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, सचिव कैलास दळवी, उपाध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित होते. नूतन कार्यालयात कामाचा शुभारंभ वयोवृध्द स्वच्छता कर्मचारी सुंदराबाई मिसाळ यांच्या हस्ते झाला. मंचाचे सदस्य पुरूषोत्तम गारदे यांनी नवीपेठेतील स्व मालकीची जागा जागरूक मंचच्या कार्यालयासाठी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
परमार म्हणाले, नगर शहराला मोठा वारसा आहे. अशा ऐतिहासिक शहराच्या समस्या दूर करण्यासाठी व शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी जागृक नागरिक मंच करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. प्रत्येक गावात 5 टक्के अनिष्ठ जनता असते, अशा अनिष्ठ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करत पुढे चालावे. यावेळी माजी महापौर कळमकर यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक मंचाचे अध्यक्ष मुळे यांनी केले. शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिकांना एका छताखाली आणून जागरूक नागरिक मंचाची स्थापना काही महिन्यांपूर्वी केली. आपआपल्या क्षेत्रातील प्रश्‍नांची जाण असलेले सदस्य मंचात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. पंडित यांनी स्वागत केले. आभार राजाभाऊ पोतदार यांनी मानले. यावेळी बाळासाहेब भुजबळ, सुनील कुलकर्णी, राजेश टकले, जयकुमार मुनोत, अभय गुंदेचा, विष्णू सामल, संजय वल्लाकट्टी, राजकुमार जोशी, नंदकुमार शिंदे, अमृत बोरा, अमोल डुंगरवाल, उस्मान शेख, सुनील रुणवाल, लालूशेठ मध्यान, प्रा. मधुसूदन मुळे, एन.डी. कुलकर्णी, प्रा. माणिक विधाते, संजय झिंजे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*