Photo Gallery : जागतिक महिला दिनानिमित्त प्रभात फेरीद्वारे ‘लेक वाचवा’चा संदेश

0

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित प्रभातफेरीतून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा संदेश देण्यात आला. हुतात्मा स्मारक येथे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महिला व बालविकास विभागीय उपायुक्त बी.टी.पोखरकर, जिल्हा महिला व बालविका अधिकारी देवेंद्र राऊत, बालविकास अधिकारी चंद्रशेखर पगारे, योगीता जोशी, क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक आदी उपस्थित होते.

यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून ‘माझी कन्या भाग्यश्री’, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, अंगणवाडीत महिलांना मार्गदर्शन आदी विविध विषयांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करून श्री. डवले यांनी महिला सक्षमीकरणाबरोबरच स्त्री भृणहत्येविरोधात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी स्त्री-पुरुष समानता आणि  महिलांच्या हक्कांचा आदर करण्याची शपथ घेण्यात आली. सी.बी.एस.सिग्नल, शिवाजी गार्डन, शालीमार चौक, परशुराम सायखेडकर नाट्यगृह, रेडकॉस सिग्नल, एम.जी. रोड मार्गे हुतात्मा स्मारकाजवळ प्रभातफेरीचा समारोप करण्यात आला.  प्रभातफेरीत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*