जवान मॅथ्यूच्या आत्महत्येची वरिष्ठ पातळीवर चौकशी – केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

0

नाशिक : देवळाली कॅम्प येथे आत्महत्या केलेल्या जवानाच्या मृत्यूची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये आयोजित डिजीधन मेळाव्यात बोलत होते.

जवान रॉय मॅथ्यूच्या आत्महत्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तसेच गृहमंत्रालय मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कुठलं स्टिंग झालं होतं..? त्यात काय तथ्य होत..? याचाही तपास जलद गतीने करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे आहे प्रकरण :

रॉय मॅथ्यू या जवानाने एका व्हिडिओतून अधिकारी कशाप्रकारे त्यांच्या घरी राबवतात? तसेच अधिकाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडणे, त्यांच्या घरातील कुत्र्यांना फिरवणे सारखे काही कामे केले जात असल्याचे एक व्हिडीओद्वारे सैन्यातील जवानांची व्यथा मांडली होती.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर जवानांच्या परिस्थितीचा मुद्दा सर्वानीच उचलून धरला होता. रॉयच्या व्हिडीओची दखल लष्कर प्रमुखांना घ्यावी लागली होती.

या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादाशी मॅथ्यूच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? याचा तपास करण्यात येतोय. रॉयचा मोबाइल आणि मल्याळम भाषेत लिहिलेली त्याची एक डायरी आढळून आली आहे.यामध्ये रॉय सर्वांची माफी मागत असल्याचे समजते. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या डायरीचे भाषांतर करण्यात येत असून लवकरच याबाबत काही गूढ उकलण्याची शक्यता आहे.

तसेच जवानाचा मोबाईल तांत्रिक तंत्र्यांकडे हस्तांतरित करण्यात आले असून यातील फुटेज तसेच व्हिदिओ आणि ऑडीओची चौकशी होणार आहे.

LEAVE A REPLY

*