जवान आत्महत्या प्रकरणी महिला पत्रकाराची सैन्य अधिकाऱ्यांविरोधात ऑनलाईन तक्रार?

0

नाशिक : जवान रॉय मॅथ्यू आत्महत्या प्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल यांची भारतीय सैन्यातील काही अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केल्याचे समजते. याबाबत एका वृत्तपत्राने माहिती दिली आहे.  त्यामुळे आता हे प्रकरण नवे  वळण घेण्याची शक्यता आहे.

देवळाली  कॅम्प येथे महिनाभरापूर्वी लष्करी जवान रॉय मॅथ्यू या जवानाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्टिंग ऑपरेशन करणारी द क्विंट न्यूज चॅनल ची पत्रकार पूनम अग्रवाल (रा. दिल्ली) व सेवानिवृत्त अधिकारी दीपचंद या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पूनमने लष्करातील काही अधिकाऱ्यांची पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल केली असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

०७ मार्च रोजी लष्करी जवान रॉय मॅथ्यू याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तत्पूर्वी अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे जवानांना घरातील कामांमध्ये अडकवले जाते, तसेच त्यांच्याकडून घरकामे, अधिकाऱ्याची मुले सांभाळणे, कुत्रे फिरवण्यास घेऊन आदी कामे कशी करून घेतली जातात. याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये रॉय मॅथ्यू याचा आवाज होता. पूनम अग्रवाल हिने याचा व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

यामुळे आपल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोर्ट मार्शल होण्याची भीती वाटल्यामुळे रॉयने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

जवान आत्महत्याप्रकरणी पत्रकारावर गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

*