जवानांनी सोशल मीडियावरील अफवांचे मेसेजेस फॉरवर्ड करू नये : राजनाथ सिंह

0

भारतीय जवानांनी सोशल मीडियावरील अफवांचे मेसेजेस फॉरवर्ड करू नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

ते गुरूवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका कार्यक्रमात बोलत होते.

सोशल मीडियावर भारताच्या शत्रूंकडून अफवा पसरवल्या जात आहेत .

काहीवेळा भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकारीही कोणतीही खातरजमा न करता व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवर हे मेसेजेस फॉरवर्ड करतात.

त्यामुळे किमान तुम्हीतरी देशाचा विचार करून खातरजमा केल्याशिवाय अशाप्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करू नका, असे आवाहन मी करतो.

मी तुम्हाला हे सांगत आहे कारण तुमच्यावर केवळ सीमेवरच्या सुरक्षेचीच जबाबदारी नाही. तर तुमच्यावर देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचीही जबाबदारी आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*