Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedजळगाव : सुरतहून विदर्भात पायी जाणार्‍या १४ जणांना घेतले ताब्यात

जळगाव : सुरतहून विदर्भात पायी जाणार्‍या १४ जणांना घेतले ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या कालावधीत  सुरत येथून विदर्भात शनिवारी सकाळी पायी जाणार्‍या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्यांना पोलिसांनी आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.
सुरतहून काही जण पायदळ विदर्भात जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक अजिंठा चौफुलीवर रवाना झाले. पोलिसांनी रणजीत परशुराम राठोड, नीलेश विसावर राठोड, निखील प्रकाश चव्हाण, किशोर रामदास जाधव, नीलेश जंगू पवार, राजू सुरेश राठोड, राहुल बबन मंडळ, राईदुल बारा गुलाम बारा, पोभी सेन सुनील सेन, अविनाश पुंडलिक चव्हाण, प्रवीण पुंडलिक पवार, सचिन शांताराम पवार, उमेशर प्रेम राठोड, रवी मोहन राठोड (ता. दरवा, जि. यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात  आरोग्य तपासणीसाठी रवाना केले. ही कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल इम्रान सय्यद, मुद्दस्सर काझी, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी  केली.
जेवण व मास्कचे वितरण शहरातील देवा तुझा मी सोनार आणि पातोंडकर ज्वेलर्सचे संचालक किरणशेठ पातोंडकर यांच्यातर्फे सर्वांना मास्क व सॅनीटायझर वाटप करण्यात आले. तर श्याम चव्हाण, शेख सादीक शेख मेहबूब, इम्रान खाना अकबर खान, निजाम मुलतानी यांनी जेवणाची व्यवस्था केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या