जळगाव शहर हगणदारीमुक्त – प्रशासनाचा दावा : तपासणीसाठी राज्यस्तरीय समिती येणार

0

जळगाव | प्रतिनिधी : शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी दि.१५ मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने शहरातील संपूर्ण ५८ ठिकाण हगणदारीमुक्त झाल्याचा दावा करुन आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहर हगणदारीमुक्त जाहीर केले आहे. दरम्यान, तपासणीसाठी समिती पाठवावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून लवकरच राज्यस्तरीय समितीतर्फे पाहणी केली जाणा

Jivan Sonawaneर आहे. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने दि.१५ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच हगणदारीमुक्त न झाल्यास कुठलेही विशेष अनुदान दिले जाणार नाही, असा इशारा देखील शासनाने महापालिकेला दिला आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करुन ५८ ठिकाण शोधून हगणदारीमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला.

त्या अनुषंगाने शहरातील वार्ड क्र. १ – कानळदा रोड अक्षय किराणा रोड, कानळदा रोड लक्ष्मी नगर समोरील भाग, अगरबत्ती कारखाना रोड, दुध फेडरेशन समोर व राजा ट्रेंक्टर समोर, एम.ई.सी.बी.रोड भारत नगर, खळकेचाळ सार्व.शौचालया बाहेर. वार्ड क्र. २ – उर्दू शाळा गेंदालाल मिल. वार्ड क्र. ३ – रेल्वे पुला जवळ. वार्ड क्र.४ – स्मशानभूमी रस्ता, शिवाजी नगर. ममुराबाद रोड, रेल्वे पुला जवळ. वार्ड क्र.५ – जुना असोदा रोड, खेडी विनायक नगरजवळ, खेडी सुदर्शन नगर, खेडी रिक्षास्टॉप व नाला. वार्ड क्र.६ – वाल्मिकनगर, सार्व.शौचालया बाहेर. वार्ड क्र. ९ – जळकी मिल. वार्ड क्र.११ – म्हाडा कॉर्टर जवळ रेल्वे लाईन. वार्ड क्र.१२ – निमखेडी गावठाण रोड. वार्ड क्र.१३ – शिंदे नगर, पांचाळ यांचे घराजवळ. वार्ड क्र.१४ – संत मिराबाई नगर रोड, म्हसोबा रोड, कुंभारवाडा मागे. वार्ड क्र.१५ – खंडेराव नगर, रोड रेल्वे लाईन, हुडको रोड, दिक्षा भूमी रोड. वार्ड क्र.१६ – हरीविठ्ठल नगर, मारोती मंदिरा मागे. गुल मोहर कॉलनीच्या बाजुला. वार्ड क्र.२० – लक्झरी बस स्टॉप. मच्छी बाजार आर.के.ट्रान्सपोर्ट जवळ. वार्ड क्र.२१ – भवानीपेठ शाळा क्र.८ मागील बोळ, लिधुरवाडा सार्व.शौचालया बाहेर, मणियारवाडा सार्व. शौचालया बाहेर, बालाजीपेठ, स्त्रीच्या सर्वा.शौचालया बाहेर. वार्ड क्र.२२ – गोपाळपुरा सार्व.शौचालयाचे बाहेर. वार्ड क्र.२३ – पांझरापोळ सार्व.शौचालयाच्या बाहेर, नशिराबाद रोड सार्व.शौचालयाचे बाहेर. वार्ड क्र.२४ – कासमवाडी एल पट्टा, तुकारामवाडी पाणीपुरवठा कार्यालय जवळ भाग. वार्ड क्र.२५ – रणछोड नगर, पंचमुखी हनुमान मंदिरामागे. सम्राट कॉलनी थिएटर रोड व हायवे. वार्ड क्र.२६ – अंध शाला समोरील पट्टांगण व शाळा क्रं.३० च्या मागील भाग. वार्ड क्रं. २७ – तापी पाटबंधारे विश्रामगृह परिसर, शाळा नं.४५ समोर, इच्छादेवी चौक. वार्ड क्र.२९ – सुरेश शॉपीच्या रोडवर पारखवाडी, इच्छादेव ते बेंद्र हॉस्पिटल समोर हायवे रोड. वार्ड क्र. ३० – इच्छादेवी चौक सदोबा वेअर हाऊस जवळ. वार्ड क्र.३२ – मिल्लत हायस्कुल समोरील परिसर. वार्ड क्र.३४ – कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, सुप्रिम कॉलनी मेन रोड. वार्ड क्र.३५ – मेन रोड रामनगर समोर, रामेश्‍वर कॉलनी, स्मशानभूमी रोड मेहरुण महाजन नगर. वार्ड क्र.३७ – कोल्हे हिल रोड वंजारी टेकडी, अभियंता सोसायटीच्या बाजुला, नागेश्‍वर कॉलनी. असे एकूण ५८ ठिकाण हगणदारीमुक्त झाल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

दरम्यान, लवकरच शासनाची राज्यस्तरीय समिती तपासणीसाठी येणार आहे.

LEAVE A REPLY

*