जळगाव-भादली रूळावर आढळला मृतदेह

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-भादली रेल्वे रुळावर मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव भादली रेल्वेरुळावरील खांबा क्रमांक 421/15 दरम्यान एका इसमाचा मृतदेह आढळुन आला.

याच मार्गावरुन जाणार्‍या रेल्वे क्रमांक 12167 वरील चालकाला तो मृतदेह दिसला. त्यांनी उपस्टेशन प्रबंधकांना घटनेची माहिती दिली़ त्यावरुन उपस्टेशन प्रबंधकांनी तालुका पोलीसांना कळविले.

पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपास पोहेकॉ. सोनार करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नव्हती.

LEAVE A REPLY

*