जळगाव भाजपात अध्यक्षपदावरुन काथ्थ्याकुट

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपासह सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली होत आहे. दरम्यान आज वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या भाजपाच्या कोअर कमेटीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून चांगलीच काथ्थ्याकुट झाली. अद्याप अध्यक्षपदासाठी कुणाचेही नाव निश्‍चीत झाले नसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली.

जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदासाठी उद्या दि. २१ रोजी निवडणुक होणार आहे. निवडणुकीत भाजपाचे ३३ सदस्य निवडुन आले असुन बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. भाजपाने बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी नाव निश्‍चीत करण्यासंदर्भात आज भाजपा कार्यालयात कोअर कमेटीची बैठक झाली.

या बैठकीला माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, ना. गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खा. रक्षा खडसे, खा.ए.टी. पाटील, आ.हरीभाऊ जावळे, आ. स्मिता वाघ, ना. प्रयाग कोळी, आ. चंदुलाल पटेल, आ. राजुमामा भोळे, आ. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, ऍड. किशोर काळकर, प्रा. सुनिल नेवे आदी उपस्थित होते.

तब्बल तासभर बंदद्वार कोअर कमेटीची बैठक सुरूच होती. तासाभराच्या काथ्थ्याकुटनंतरही अध्यक्षपदासाठी कुणाचेही नाव निश्‍चीत झाले नाही. दरम्यान बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले की, सदस्यांशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्षपदाचे नाव निश्‍चीत केले जाणार आहे. अध्यक्ष भाजपाचाच होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौघांची नावे चर्चेत

जिल्हा परीषद अध्यक्षपदासाठी वर्डी-गोरगावले गटातील ज्योती पाटील, खिरवड-ऐनपुर गटातील रंजना पाटील, पाचोरा तालुक्यातील विजया पाटील, उज्वला पाटील या चार महिला सदस्यांची नावे चर्चेत आहेत.

LEAVE A REPLY

*