जळगाव पंचायत समित्यांमध्ये भाजपा ‘नंबर १’

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या आज झालेल्या सभापती व उपसभापती निवडीत भाजपा नंबर १ ठरली असून १० पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा फडकला असून तीन ठिकाणी शिवसेनेने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीने एक पंचायत समिती काबिज केली असून एका ठिकाणी कॉंग्रेस पुरस्कृत भाजपा बंडखोराने विजय मिळविला आहे.

जळगाव येथे भाजपाच्या यमुनाबाई रोटे सभापती तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या शीतल पाटील, भुसावळ येथे सभापतिपदी भाजपाचे सुनील महाजन तर उपसभापतिपदी भाजपाच्याच मनीषा पाटील, यावलला कॉंग्रेस पुरस्कृत भाजपा बंडखोर संध्या महाजन सभापती तर कॉंग्रेसचे उमाकांत पाटील उपसभापती.

पारोळा येथे सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुनंदा पाटील, उपसभापती शिवसेनेचे अशोक पाटील, जामनेरला सभापतिपदी भाजपाच्या संगिता पिठोडे, तर उपसभापतिपदी गोपाळ नाईक, धरणगावला सभापतिपदी शिवसेनेच्या मंजुषा पवार तर उपसभापतिपदी प्रेमराज पाटील, चोपड्यात भाजपाचे आत्माराम म्हाळके सभापतिपदी तर उपसभापतिपदी शिवसेनेचे मच्छिंद्र पाटील, मुक्ताईनगरला सभापतिपदी भाजपाच्या शुभांगी भोलाणे तर उपसभापती प्रल्हाद जंगले, चाळीसगावला सभापतिपदी भाजपाच्या स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील.

रावेरला सभापतिपदी माधुरी नेमाडे तर उपसभापतिपदी अनिता चौधरी, पाचोर्‍याला भाजपाचे सुभाष पाटील सभापती तर उपसभापती अनिता पवार, बोदवडला सभापतिपदी भाजपाचे गणेश पाटील, उपसभापती दीपाली राणे, अमळनेरला सभापतिपदी वजाबाई भील तर उपसभापतीपदी त्रिवेणीबाई पाटील, भडगावला सभापतिपदी शिवसेनेच्या हेमलता पाटील, उपसभापतिपदी प्रताप सोनवणे, एरंडोलला सभापतिपदी शिवसेनेच्या रजनी सोनवणे तर उपसभापतिपदी विवेक पाटील यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

*