जळगाव जि.प. साठी राष्ट्रवादी शिवसेनेची युती, भाजपासह राष्ट्रवादी शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल

0

जळगाव | प्रतिनिधी :  येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी चर्चेच्या अनेक फेर्‍या झडल्यानंतर भाजपातर्फे अखेर अध्यक्षपदासाठी उज्वला मछिंद्र पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी नंदकिशोर महाजन यांनी अर्ज दाखल केल आहेत. तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने युती केली आहे.

shivsena logoiBJP mnsbjp-hidden-pact-out-in-open-after-support-to-munde-ncp_160414072838

राष्ट्रवादी व शिवसेनेच्या युतीकडून अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे गोपाल चौधरी यांनी अर्ज दाखल केले आहेत.

अकरा ते एक वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. तर दुपारी १ ते ३ या वेळेत अर्जांची छाननी होईल. दुपारी तीन नंतर अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीचे तीन तर कॉंग्रेसचे दोन भाजपाच्या संपर्कात

दरम्यान जि.प.त बहुमतासाठी केवळ एका मताची गरज असल्याने भाजपातर्फे राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या सदस्यांना फोडले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे तीन तर कॉंग्रेसचे दोन असे पाच सदस्य भाजपाच्या संपर्कात आहेत.

राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाल्याने भाजपाने सावध पवित्रा घेतला असून अगोदरपासून पाच सदस्यांना आपल्याकडे वळते केलेले असले तरी एैन मतदानावेळी काय होईल याकडे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

*