जळगाव जि.प. अध्यक्षांची २१ तर पं.स. सभापतींची १४ रोजी निवड

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या नुतन अध्यक्षपदासाठी दि.२१ मार्च रोजी तर पंचाय समित्यांच्या सभापतीपदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे.

मावळत्या जि.प. सदस्यांची मुदत २१ मार्च रोजी संपणार असून याच दिवशी नुतन अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

तर १५ तालुक्यांच्या पंचायत समिती सभापतीपदासाठी दि.१४ मार्च रोजी विशेष सभा घेतली जाईल. मावळत्या पंचायत समिती सभापतींची मुदत दि.१३ रोजी संपणार आहे. याबाबतचा सविस्तर कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

LEAVE A REPLY

*