जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्याच्या सभापती व उपसभापतींची निवड जाहीर

0

जळगाव | प्रतिनिधी  |  येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यात जळगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, रावेर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव येथे भाजपाचे उमेवार विजयी झालेत. तर धरणगाव, एरंडोल व ीडगाव येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत. तर पारोळा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. तर यावल येथे कॉग्रेस पुरस्कृत भाजपा उमेदवार विजयी झालेत.

त्यांचा निकाल असा
यावल – यावल पंचायत समिती सभापतीपदी संध्या किशोर महाजन (भाजपा) उपसभापतीपदी उमाकांत पाटील (कॉंग्रेस),
चाळीसगाव – सभापती स्मितल बोरसे , उपसभापतीपदी संजय पाटील (दोघेही भाजपा)
पारोळा – सभापतीपदी सुनंदा पाटील (रा कॉ), उपसभापतीपदी अशोक नागराज पाटील (रा. कॉ)
रावेर – सभापतीपदी माधुरी गोपाळ नेमाडे, उपसभापतीपदी अनिता महेश चौधरी
मुक्ताईनगर -सभापतीपदी शुभांगी भोलाणे, उपसभापतीपदी प्रल्हादभाऊ जंगले
बोदवड – सभापतीपदी गणेश पाटील उपसभापतीपदी दिपाली राणे
जळगाव – सभापतीपदी यमुनाबाई रोटे (भाजपा), उपसभापतीपदी शितल पाटील (शिवसेना)
धरणगाव – सभापतीपदी मंजुषा सचिन पवार (शिवसेना), उपसभापतीपदी प्रेमराज पाटील (शिवसेना)

LEAVE A REPLY

*