जळगाव जिल्ह्यातील डॉक्टर रस्त्यावर

0

जळगाव |  प्रतिनिधी :  डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांसह रूग्णालयांना सुरक्षा मिळण्याकामी आज जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स रस्त्यावर उतरले.  इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मोर्चात फलकाद्वारे संदेश

मोर्चामध्ये ‘रस्ते पर रहेंगे सही, पर सुरक्षा नही तो काम नही’, सेव्ह डॉक्टर, आय प्रोटेस्ट द अटॅक्स ऑन डॉक्टर अशा घोषणांचे फलक डॉक्टरांकडुन झळकविले जात होते.

प्रशिक्षणार्थींचाही सहभाग

मोर्चामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचाही सहभाग होता. यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.

प्रवेशद्वारावर सभा

आयएमए सभागृहापासुन सुरू झालेला हा मोर्चा नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्यचौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या ठिकाणी आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी शासनाने मागण्या मान्य केल्या असल्यातरी त्यासंबंधीचे लेखी आश्‍वासन मिळावे अशी मागणी केली.

प्रशासनाला निवेदन

मोर्चानंतर आयएमए असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ. अंजली भिरूड, डॉ. विलास भोळे, डॉ. राधेशाम चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. सीमा पाटील, डॉ. राजश्री सादुलवाड, डॉ. दिप्ती पायघन, डॉ. रूपाली बेंडाळे, डॉ. तिलोत्तमा गाजरे, डॉ. मनिषा दमानी, डॉ.प्रताप जाधव, डॉ.तुषार बोरोले, डॉ.गोविंद मंत्री, डॉ. पराग नहाटा, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.निलेश चांडक, डॉ.विनोद जैन, डॉ.परेश दोषी, डॉ.अनिता भोळे, डॉ.ज्योती गाजरे, डॉ.श्रद्धा चांडक, डॉ.नंदा जैन, डॉ.दीपाली कांकरिया, डॉ.शेखर रायसोनी, डॉ.सुनील अटल, डॉ.रणजित चव्हाण, डॉ.अनुज पाटील, डॉ.सचिन खर्चे, डॉ.प्रकाश चित्ते, डॉ.प्रकाश महाजन, डॉ.दिलीप चव्हाण, डॉ.कमलेश बारी, डॉ.गजानन पाटील, डॉ.श्रेणीक भन्साळी, डॉ.प्रकाश संघवी उपस्थित होते. यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवाशक्तीचाही पाठींबा

युवाशक्ती या संघटनेनेही डॉक्टरांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विराज कावडीया यांच्यसह पदाधिकार्‍यांनीही मोर्चात सहभाग घेतला.

अशा आहेत मागण्या

* डॉक्टरांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाकडुन ठोस उपाययोजना
* सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी रूग्णालयांना सुरक्षा पुरवण्यात यावी
* निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचा लेखी खुलासा शासनाने द्यावा.

LEAVE A REPLY

*