जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित

0

जळगाव |  प्रतिनिधी : तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. उन्हामुळे उष्माघात होवून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र वैद्यकीय यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून शहाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून मे हिटचा तडाखा यंदा मार्च महिन्याच्या एंडलाच जाणवू लागला असल्याने जिल्ह्याचे तापमानाने चाळीशी पार केली आहे. सकाळपासूनच पडणार्‍या रणरणत्या उन्हाच्या झळा असह्य होवू लागल्याने दुपारी अकरावाजे नंतर ऐरवी गर्दीने फुल्ले असणारे रस्ते, बाजारपेठाही दुपारच्या वेळी सुमसाम दिसुन येत आहे.

तसेच शरीरातील उष्णता वाढल्याने व पाण्याचे प्रमाण वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. उष्माघात झाल्यास रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात वातावरणुकुलीत उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.

त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. दरम्यान उष्माघाताचे प्रमाण सर्वाधिक ग्रामीण भागात होत असल्याने शेतकर्‍यांनी दुपारच्या वेळेस शेतात जाणे टाळावे तसेच उन्हात जात असतांना उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

उष्माघाताची लक्षणे

वाढलेल्या पारामूळे चक्कर येणे, डोके दुखी, डोळे जळजळ करणे, पोटदुखणे, उलट्या होणे, घसा कोरडा पडणे, अतिघाम, अस्वस्थ जाणवणे इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यास उष्मघाताचा होण्याची शक्यता असते. तसेच उष्माघात प्रमाण प्रामुख्याने ५० वर्ष पेक्षा अधिक व लहान विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणात होत असते.

नागरीकांनी घ्यायवयाची काळजी

तापमानात वाढ होत असल्याने शरीराचे तापमान देखील वाढत आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असल्याने नागरीकांनी रणरणत्या उन्हात बाहेर जावू नये, बाहेर जातांना गॉगल्स व रुमालाचा वापर करावा, शक्यतो खादीचे कींवा सफेद कलरचे कपडे परिधान करावे, दिवसभरात भरपुर पाणी प्यावे, उन्हातून आल्यानंतर लागलीच एसी, कुलरच्या गारव्यात जावू नये, शरीराला गारवा देणारे शितपये प्यावी व रसदार फळांचे अधिक प्रमाणात सेवन करुन शरीराचा समतोल राखून शरीराची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय सुत्रांकडून दिला जात आहे.

LEAVE A REPLY

*