जळगाव घरकूल खटल्याचे सोमवारी कामकाज

0
धुळे / जळगाव घरकुल खटल्याच्या कामकाजासाठी पी.एल.गजभिये यांची विशेष न्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या खटल्याचे कामकाज आता 12 जून रोजी होईल.
जळगाव घरकूल खटल्याच्या कामकाजासाठी विशेष न्यायाधिश म्हणून आर.आर.कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही उत्कृष्ठ कामगिरीमुळे न्यायाधिश आर.आर.कदम यांना दोन वर्ष वाढीव देण्यात आले होते.
त्यानंतर एप्रिल अखेर न्यायाधिश कदम हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या खटल्यासाठी विशेष न्यायाधिश म्हणून गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी आठवड्यातून तीन दिवस आणि नंतर नियमीत या खटल्याचे कामकाज चालविण्यात येत होते.

एप्रिल महिन्यात सीआरपीसी कलम 313 प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदवण्याचे कामकाज पूर्ण झाले. आरोपी जगन्नाथ वाणी यांच्या वकिलांनी बचाव पक्षाचे काही साक्षीदार तपासायचे असल्याचे न्यायालयाला सांगितले.

या खटल्याच्या कामकाजाला आता 12 जूनपासून सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

*