जळगावात १५ मोबाईल टॉवर्स सिल

0

जळगाव | प्रतिनिधी :  थकबाकी आणि दंडात्मक रक्कम भरण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील १७३ मोबाईल टॉवर्सधारकांना नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु अद्यापपर्यंत थकबाकी न भरल्यामुळे प्रशासनातर्फे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून शहरातील १५ मोबाईल टॉवर्स सील केले आहे.

महानगरपालिका हद्दीत १७४ मोबाईल टॉवर्सपैकी एक अधिकृत तर १७३ अनाधिकृत मोबाईल टॉवर्स आहेत. संबंधित मोबाईल टॉवर्सधारकांकडे गेल्या दोन वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असून दंड देखील लावण्यात आला आहे.

थकबाकी भरण्यासाठी २५ जानेवारी २०१७ रोजी संबंधित मोबाईल टॉवर्सधारकांना नोटीस बजावून थकबाकी भरण्यास १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु मुदतीच्या नंतरही थकबाकी आणि दंडात्मक रक्कम न भरल्याने मोबाईल टॉवर्स सील करण्याच्या कार्यवाहीची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.

दरम्यान प्रभाग समिती क्र.१ मधील ४ मोबाईल टॉवर्स, प्रभाग समिती क्र. ३ मधील ४ आणि प्रभाग समिती क्र. ४ मधील ७ असे एकूण १५ मोबाईल टॉवर्स सील करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*