जळगावात शुक्रवारपासून पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सव- बेगम परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार

0

जळगाव |प्रतिनिधी :  राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आणि चांदोरकर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दि.१७ ते १९ रोजी या कालावधीत जळगावातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात पं.भीमसेन जोशी स्मृतीशास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री ना.विनोद तावडे यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका बेगन परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून यावर्षी ज्येष्ठ गायिका बेगन परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दि. १७ ते १९ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ रोजी गायिका प्रिती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील.

तर दि. १८ रोजी गायक देबबर्ण कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोदवादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना त्यांच्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. दि. १९ रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरीवादक विवेक सोनार आपली कला सादर करतील.

LEAVE A REPLY

*