जळगावला १२ वीच्या इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थ्यांवर कारवाई

0

जळगाव |  प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी पेपरला जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

बारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरने सुरुवात झाली. जिल्हाभरात ६९ केंद्रांवर परीक्षा सुरु असून सुमारे ५१ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी तसेच परीक्षावेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाभरात ४ बैठे पथक व १५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बैठे पथक व भरारी पथक असून देखील पहिल्याच दिवशी शहरातील काही परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस पडला होता. त्यामुळे केंद्रामध्ये सबकुछ अलबेला असल्याचे चित्र दिसून आले.

तसेच इंग्रजीच्या पेपरला नूतन मराठा महाविद्यालयात कॉपी करणार्‍या दोन कॉपी बहाद्दरांवर शिक्षण मंडळाच्या सदस्या शुभांगी राठी यांच्या पथकाने कारवाई केली.

LEAVE A REPLY

*