जळगावला डॉक्टर्स आंदोलनावर ठाम

0

जळगाव |  प्रतिनिधी :  रूग्णालयातील सुरक्षितेच्या मागणीसाठी आयएमएने राज्यात बेमुदत संप पुकारला असून, राज्य सरकारला केलेल्या मागणीनुसार डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्थेची पुर्तता करावी. डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला आज जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला.

जवळपास सर्वच शाखांच्या सर्व संघटनांनी पाठींबा दिल्याने जिल्ह्यातील १ हजार हॉस्पिटलचे १३०० डॉक्टरर्स यात सहभागी झाल्याने दिवसभर दवाखाने बंद होते. परिणामी रूग्णांना तपासणीसाठी फिरावे लागत होते. दरम्यान जिल्हा रुग्णालयात ओपीडी सेवा सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.

आयएमएने राज्यव्यापी संप पुकारला असून या डॉक्टरांच्या संपाला जिल्हयाभरातून १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. डॉक्टर तसेच रुग्णालयावर होणारे हल्ले रोखणे आणि सेवेतून कमी केलेल्या निवासी डॉक्टरांना कामावर घेणे यासह विविध मागण्यांकरिता आयएमएतर्फे राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.

आयएमएने पुकारलेल्या बेमुदत बंदला केमिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र सेल्स ऍण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशनने पाठींबा दिला आहे. खाजगी रुग्णालयामधील रुग्ण तपासणी करण्याचे काम बंद होते. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे चांगलेच हाल झाले.

खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी होत नसल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. परिणामी जिल्हा रुग्णालयात ओपीडी विभागात रुग्णांची दिवसभर तपासणी सुरु होती. अत्यवस्थ रुग्णांची प्राथमिक तपासणी करून रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची सेवा सुरु असल्याचे आयएमएचे डॉ.पाटील यांनी सांगितले. तसेच सकाळी झालेल्या बैठकीत ३५० डॉक्टरर्संनी सहभागी होवून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. या बैठकीवेळी डॉ.अर्जून भंगाळे, डॉ. अनिल पाटील, डॉ.विलास भोळे, डॉ. प्रताप जाधव, डॉ. मनिषा दमाणी, डॉ. सिकची उपस्थित होते.

दुपारपर्यंत मेडिकलही बंद

डॉक्टरांच्या बंदला केमिस्ट असोसिएशनने देखील पाठींबा दर्शविला आहे. या पाठींब्यानंतर जिल्ह्यातील सर्व मेडिकल बारा तास बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनतर्फे घेण्यात आला होता.

त्यानुसार बुधवारी रात्री बारा ते दुपारी बारापर्यंत मेडिकल बंद ठेवण्यात आले होते. दुपारी बारानंतर मात्र, सर्वच मेडिकल खुले करण्यात आले होते.

संघटनांचा पाठींबा

रूग्णालयातील सुरक्षितेच्या मागणीसाठी आयएमएने राज्यात बेमुदत संप पुकारला असून, राज्य सरकारला केलेल्या मागणीनुसार डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्थेची पुर्तता करावी. जेणेकरून कोणताही दबाव न घेता डॉक्टरांना उपचार करता येतील. मागणीसाठी पुकारलेल्या डॉक्टरांच्या संपाला महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकिय प्रतिनिधी संघटनेच्यावतीने पाठींबा दर्शविला आहे.

तसेच आयएमएतर्फे पुकारण्यात येणार्‍या आंदोलनात सहभागी होण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. शिवाय, आर.पी.आय. महिला आघाडीच्यावतीने देखील आयएमएफच्या बंदला पाठींबा दिला आहे.

LEAVE A REPLY

*