जळगावच्या लाकुडपेठमधील विद्यार्थिनीचे अपहरण

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील लाकुडपेठ भागातील एका सहावीच्या विद्यार्थींनीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमूळे परिसरातील पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेंदालाल मिल परिसरात अनिल वासुदेव घाटे हे पत्नी मुक्ता व मुलगी भावना उर्फ संजना ह्यांच्यासोबत राहतात. हे भावना ही परिसरातीलच खुबचंद सागरमल विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेते. बारावीचे पेपर सुरु असल्याने शाळा दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान भरते.

गुरुवारी शाळेत जाते असे सांगून भावाना घरातून शाळेकडे निघाले. दरम्यान शाळेत जात असतांना एका तोंडाला स्कॉर्फ बांधलेल्या तसेच पंजाबी ड्रेस घातलेली महिलेने तिच्याशी काहीतरी बतावणी केली. यावेळी जैन मंदीराच्या पाठीमागे असलेल्या मराठा मंगल कार्यालयाजवळून त्या महिलेने संजनाला अपहरण करुन घेवून गेल्याचे एका मुलीने पाहिले. असे काहींनी मुलीच्या नातेवाईकांना सांगितल्याचे मुलीच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

अनिल घाटे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीसांकडून चौकशी सुरू असून लवकरच मुलीचा शोध घेतला जाईल असे पोनि. प्रदीप ठाकुर यांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगितले.

मैत्रीणीने आवाज दिल्यावर मुलीने पाहिले नाही

शाळेत गेलेली मुलगी घरी परतली नसल्याने आई वडीलांना काळजी पोट मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ति मिळून आली नाही. जैन मंदीराजवळील नागरीकांनी तिच्या मैत्रीणीने तिला आवाज दिले. मात्र तिने पलटूनही पाहिले नाही.

परिसरात भितीचे वातावरण

शाळेत गेलेल्या विद्यार्थीनीचे अपहरण झाल्याचे माहिती गेंदालाल मिल परिसरात पसरली. यामूळे भावनाच्या मैत्रणींसह पालकही भयभित झाले आहेत.

LEAVE A REPLY

*