जळगावकरांच्या मानगुटीवर भारनियमनाचे भूत

0

जळगाव |  प्रतिनिधी : ऐन उन्हाळयाच्या दिवसामध्ये आपत्कालीन भारनियमनाच्या नावाखाली शहरात महावितरणकडून ३ ते ५ तास भारनियमन केले जात आहे.त्यामुळे मार्च महिन्यापासून जळगावकरांना भारनियमनाचा भार सहन करावा लागणार आहे. शहरातील काही भागात भारनियमनला सुरवात झाली आहे.

जळगाव शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून मे हिटचा तडाखा मार्च एंडलाच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळीस ओलांडली असल्यानेजळगावकर चांगलेच घामाघुम होवू लागले आहे. उन्हाळयाच्या दिवसात अचानक वापर वाढल्याने विद्युत प्रणालीवर अतिरिक्त भार निर्माण झाला असल्याने महावितरणच्या भारनियमन व्यवस्थापनाने ३ ते ५ तास आपतकालीन भारनियमनाला सुरवात केली आहे. त्यामुळे दुपार्‍यावेळी देखील भारनियमन होत असल्याने मार्च एंडलाच जळगावकर घामाघुम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

mahaVitran

परिक्षा कालावधीत भारनियमनाचा त्रास

मार्च/एप्रिल महिन्यात महाविद्यालयीन परिक्षाना सुरवात होत असते. ऐन परिक्षेच्या काळात आपतकालीन भारनियमनाला सुरवात झाली असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

चिमुकले, अबालवृध्दाचे हाल

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लहान मुलांसह अबादलवृध्दांना उन्हाचा त्रास जाणवू लागला आहे. अशाच परिस्थितीत महावितरणकडून दररोज सकाळ व सायंकाळी भारनियमन केले जात असल्याने चिमुकले व अबालवृध्दांचे मोठया प्रमाणावर हाल होत आहे.

नागरिकांकडून अचानक विजेचा वापर वाढल्याने भारनियमन व्यवस्थापनाने आपतकालीन भारनियमनाचा निर्णय घेतला असल्याने शहरातील काही भागात भारनियमनला सुरवात करण्यात आली आहे
– किशोर खोबरे  जनसंपर्क अधिकारी, महावितरण

LEAVE A REPLY

*