जलसंपदामंत्र्यांच्या कारला धक्का – पोलिसांसह मनपाकडून रेल्वेस्थानक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

0

जळगाव | प्रतिनिधी : रेल्वे स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत हातगाड्या टपर्‍या चालु असल्याने नेहमी हुमरी तुमरीच्या घटना घडतात. याप्रसंगातुन जलसंपदामंत्रांनाही जावे लागले. मात्र जलसंपदामंत्र्याच्या फोनवरुन पोलीस दलाने रात्रभर कारवाईची मोहीम हाती घेतली. विनाकारण रेल्वेस्थानकाजवळ येणार्‍या वाहन चालकांसह परिसरात हातगाड्या लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन हे त्यांच्या कारने जळगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री आले. मुंबई येथे विदर्भ एक्सप्रेसने जात असल्याने ते रेल्वेस्थानकावर आले होते.

त्याचे वाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून वळण घेत असतांना एका दुचाकीचा कट त्यांच्या वाहनाला लागला. यावरुन दुचाकी चालकाने मंत्री महोदयांच्या कारवरील चालकाशी किरकोळ वाद घातला.

यानंतर जलसंपदामंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबधीत तरुण त्याठिकाणाहुन पसार झाला. दरम्यान डीवायएसपी सचिन सांगळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, सपोनि दिपक गंधाले यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अस्थापना बंद नंतर उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या टपर्‍या चालु ठेवल्याने चार हातगाड्या पोलीसांनी जप्त केल्यात. तसेच पवन सोनवणे (वाणी रा. गेंदालाल मिल), सय्यद एैसान हैदर अली (रा. शिवाजीनगर) यांना पोलीसांनी रात्री चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये नेले. रात्री उशिरापयर्ंत दुकाने चालु ठेवल्याने मुंबई पोलीस अधिनीयमचे कलम ३१ डब्ल्यु/ १३१ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सोळा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रेल्वे स्थानकावर रात्री उशिराने ट्रीपल सीट येणार्‍या दुचाकी चालकांविरुध्द पोलीसांनी रात्रभर कारवाईची मोहीम होती घेतली. विनाकारण रेल्वेस्थानकावर येणार्‍या १६ दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर प्रत्येकी २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अतिक्रमणधारकांकडून शिवीगाळ

पोलिसांच्या सुचनेवरुन मनपाच्या अतिक्रमण विभागाने सायंकाळच्या सुमारास अचानक कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान अचानक होत असलेल्या कारवाईने परिसरात असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व दुकान चालकयांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. दरम्यान हॉटेल शिल्पा जवळ अतिक्रण काढत असतांना याठिकाणी एका अतिक्रमण धारकाने कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. त्यामुळे याठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

बेशिस्त दुचाकी व साहीत्यांची जप्ती

रेल्वे स्टेशनच्या आवारात बेशिस्त पणे लावण्यात आलेल्या दुचाकी अतिक्रमण विभागातर्फे जप्त करण्यात आल्या. तसेच या दुचाकी उचलुन त्या शहर पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या. तर बाकीचे साहित्य अतिक्रमण विभागने जप्त करुन ते मनपाच्या गोडावून मध्ये जप्त करण्यात आले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण काढीतअसतांना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व गोंधळ निर्माण होवू नये यासाठी शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी सपोनि दिपक गंधालेसह पोलिस कर्मचारी थांबून होते.

LEAVE A REPLY

*