जलयुक्त शिवारासाठी गोंडेगावची निवड

0

गाळ काढण्याचे काम लोकसहभागातूनच व्हावे ः कृषी अधिकारी

 

गोंडेगाव (वार्ताहर) – सन 2017-2018 या वर्षासाठी जलयुक्त शिवारासाठी तालुक्यातून केवळ गोंडेगाव या गावाची निवड झाली आहे. जलयुक्त शिवाराचे काम हे शासकीय अनुदानातून काम करणार असून त्यासाठी शासनाच्या विविध शासकीय विभाग यात सहभाग नोंदविणार आहेत. जलसंधारण अंतर्गत ओढा, नाला, तलाव यांच्या खोलीकरणासाठी या कामासाठी 18 रुपये घनमिटरने शासननिधी उपलब्ध करुन देणार आहेत. तसेच गाळ काढण्यासाठी मात्र लोकसहभाग नोंदविण्याचे आवाहन अधिकार्‍यांनी केले आहे.

 
अधिकार्‍यांनी काल ग्रामस्थांसमवेत शिवारफेरी पूर्ण करुन जलयुक्त शिवाराचे काम हे लोकसहभागातून घेण्याचे आवाहन कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिले आहे.

 

विविध योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी एस. के. शिरसाठ यांनी दिली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी शेख, कृषी अधिकारी अनारसे, शाखा अभियंता कासार, शाखा अधिकारी डांगे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे आर. व्ही. पाटील, कृषी पर्यवेक्षक साबळे, तलाठी ओहोळ, ग्रामविस्तार अधिकारी बांगर, कृषी सहाय्यक अधिकारी शिवाजी बढे, उपसरपंच योगेश फोफसे, नारायणराव फोफसे, विलास कदम, संभाजी फोफसे, गणेश म्हैस, एकनाथ फोफसे, उध्दराव बढे, शंतनु फोफसे, वेणूनाथ बढे, मधुकर फोफसे, मारुती तांबे, दिगंबर तांबे, चंद्रभान फोफसे, भिका फोफसे, मच्छिंद्र फोफसे, अरविंद फोफसे, पंढरीनाथ बढे, संदिप दिवटे, दिलीप फोफसे, भाऊसाहेब फोफसे, गोकूऴ म्हैस, रमेश फोफसे, सुरेश फोफसे, सर्जेराव फोफसे, भाऊसाहेब जगताप, भास्कर फोफसे, बन्सी म्हैस, बाबासाहेब फोफसे, यादव फोफसे, सुनील आमले, नारायणराव तांबे, भागवत हरगुडे, संभाजी हरगुडे, राजेंद्र कदम, आप्पासोहब तांबे, दशरथ कुर्‍हाडे, भिकन शेख, नवनाथ वाघमारे, संदीप शेलार, अण्णासाहेब कुर्‍हाडे, सोमनाथ कुर्‍हाडे, भैय्या कदम, भाऊसाहेब कदम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*