जलजागृती सप्ताहात पाणी विषयावर उखाणे, परिचय स्पर्धा

0

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने दिनांक 16 ते 2 मार्च 2017 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमतर्गत 20 मार्च रोजी महाराष्ट्र अभियात्रिकी संस्था नाशिक येथे जलसंपदा विभागात कार्यरत महिलांसाठी पाण्यावर आधारीत उखाणे व परिचय स्पर्धा अयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून कविता मोरे, सविता मोरे उपस्थित होत्या. दुपारच्या सत्रात बॉल बॅलॅन्सींग,वॉटर बॅलन्सींग आदी पाण्यावर आधारीत खेळ घेण्यात आले.या खेळात सर्वच महिलांनी मोठया उत्साहाने आपला सहभाग नोंदवला.

दरम्यान जलसप्ताहांतर्गत 22 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी जलसंपदा विभागाच्या त्र्यंबक रोड येथून ते कालीदास कलामंदिरपर्यंत काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी दिंडीचा समारोप केल्यानंतर कार्यक्रम होईल. या जलदिंडीत नाशिक शहर परिसरातील गृहिणी विद्यार्थिनी, नोकरी, व्यवसाय करणार्‍या गृहिणींनी सहभागी व्हावे असे संयोजकांनी कळविले आहे.

या जलदिंडीत सहभागी होणार्‍या महिलांना उत्कृष्ट वेशभूषा व जलजागृतीचा संदेश याकरिता वैयक्तिक व सांघिक बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.

तरी महिलांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागासाठी सोनल शहाणे, नूतन भानूवंशे, माधुरी पोखरकर, जिजा गवळी यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान जलजागृती सप्ताहाची सुरुवात सिंचन भवन येथे जलपूजन करून करण्यात आली. याशिवाय शनिवारी गंगास्वच्छता अभियान व जुने नाशिक येथे पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी जुने नाशिक भागात पाणी बचतीवर पथनाट्यही सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

*