जर मी ईदला रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही; तर जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

0

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू सणांच्या संदर्भात नवी भूमिका मांडली आहे

जर मी ईदला रस्त्यावरील नमाज बंद करु शकत नाही, तर मला पोलीस स्टेशनमधील जन्माष्टमी रोखण्याचा अधिकार नाही, असं योगी आदित्यनाथ लखनऊ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘केशव संवाद पत्रिका’ या विशेषांकाचा लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रमात म्हणाले.

आगामी काळात उत्तर प्रदेशात होणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विचार मांडले.

कावड यात्रेच्या काळात सरकारकडून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी माईक, डीजे आणि इतर वाद्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी हा मुद्दा माझ्यासमोर उपस्थित केला.

 

LEAVE A REPLY

*