Type to search

धुळे

जयहिंदमध्ये आज स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धा

Share

धुळे । महाराष्ट्राचे लाडके विनोदी व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पु.ल.देशपांडे यांच्या समृध्द कलाकृतीच्या ठेव्याचे वर्तमान युवा पिढीला स्मरण तसेच ओळख व्हावी म्हणून पु.ल.देशपांडे लिखित एकांकिका, नाटक, कथा, ललित लेख अशा कोणत्याही साहित्य प्रकारातून निवडलेल्या भागाचे एकपात्री सादरीकरण स्पर्धा स्टॅन्ड-अप कॉमेडी स्पर्धा2019 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकूण 36 केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यासाठी उद्या दि.20 जुलै रोजी सकाळी जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित, झेड.बी.पाटील महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे. वेळेवर येणार्‍या स्पर्धकांना देखील या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी सकाळी 8 वाजता नाव नोंदणीसाठी महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.पवार व संयोजकांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!