Type to search

नंदुरबार

जयनगर येथे क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे उद्घाटन

Share

नंदुरबार | जयनगर येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाचे उद्घाटन व प्रतिमा पूजन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

शहादा तालुक्यातील जयनगर येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या स्मारकाचे उद्घाटक आदिवासी पारधी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पा साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी पारधी महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष के. गोपी पारधी, महासंघाचे महासचिव रा.ना.सोनवणे ,आदिवासी पारधी महासंघाचे राज्य संघटक मुकेश साळुंखे ,गुजरात प्रदेश अध्यक्षा इंदुमती साळुंखे, राज्य संघटक बंसीलाल पवार,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक खांदे, संघटक उमाकांत पवार,नाशिक जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे,धुळे जिल्हा अध्यक्ष बापू पारधी,जळगाव जिल्हा अध्यक्ष सीताराम पारधी ,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष बापू चव्हाण, जयनगर ग्रा.प.सरपंच मीनाबाई अंकुश भील ,उपसरपंच सुनील विट्ठल माळी, आदी मान्यवर उपस्तित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आप्पा साळुंखे म्हणाले की समाजाला दिशा देण्याचे काम या क्रांतिवीर समशेरसिंग यांनी केले आहे.त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत समाजाने एकत्रित येऊन एक आदर्श समाज घडवीण्याचे कार्य आजच्या तरुणांनी केले पाहिजे.समाजाच्या हितासाठी प्रयत्न केला पाहिजे.आपल्या थोर विचारवंताचे आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन त्यांच्या विचार व जीवन चरित्राच्या आभ्यास करुण समाजाला मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन पारधी समाज जयनगर व आदिवासी पारधी महासंघ नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला होता यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!