Type to search

नंदुरबार

जयनगर येथे आज हेरंब गणेश यात्रोत्सव

Share

विनोद अहिरे
कोंढावळ ता.शहादा – शहादा तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या जयनगर येथील हेरंब गणेशाचा उद्या दि.१७ रोजी त अंगारकी चतुर्थीनिमित्त यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उजव्या सोंडेच्या व नवसाला पावणार्‍या हैरब गणेशाच्या दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याने गावकर्‍यांमार्फत युध्दपातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

जयनगर येथे अष्टभुजा भवानी माता, शिवपार्वती मंदिरे आहेत. अधिक मासात गणपती मंदिरामागे पुरातन हनुमानाची मुर्ती सापडली. त्याच्या उजव्या बाजुला महादेवाच्या दोन पिडी सापडल्या, त्याठिकाणी पुरातन मंदिर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुरातन मंदिर परिसरात स्वातंत्र्यपुर्व काळात शेतकरी व जनतने विळा घेऊन इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे गावाला ऐतिहासिक व धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. येथील प्रसिध्द हेरंब गणेशाचा इतिहास पुरातन आहे. पूर्वी त्याजागी पुरातन हेमांडपंथी मंदिर होते, ते पुर्ण दगडांच्या सहाय्याने उभारले होते. मंदिरात पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शिवलींग पुजन केल्याचा इतिहास राह या कांदबरीत करण्यात आला आहे.

नवसाला पावणाच्या हेरंब गणेशाच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातून हजारो भाविक जयनगर येथे येतात. संकष्ट चतुर्थी व अंगारकी चतुर्थीला नवस पूर्तीसाठी भाविक येतात. १९८४ यावर्षी धर्मदाय आयुक्तालयात मंडळाची अधिकृत नोंदणी झाली, विश्वस्त मंडळ स्थापन करून १९८७ यावर्षी मंदिराचा जिर्णोध्दार केला गेला. ग्रामस्थ, भाविक, देणगीदात्यांच्या सहाय्याने मंदिराची मोठी वास्तू उभारली, मंदिरातील हेरंब गणेशाची मुर्ती उजव्या सोडची असुन संगमरवर दगडाची स्वयंभू मूर्ती आहे. उजव्या सोंडेची मुर्तीही उत्तर महाराष्ट्रात एकमेव असल्याने हजारो भाविक दर्शन घेतात.

अंगारक व संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व
अंगारकी व संकष्टी चतुर्थीला विधीवत पुजा केल्यास पुण्य प्राप्त होते अशा भावनेमुळे, जयनगरला हजारो भाविकांची उपस्थिती असते व गावास यात्रेचे स्वरूप येते. भाविकांची उपस्थिती लक्षात घेत विश्वस्त मंडळाकडून मंदिर परिसर सुशोभिकरण, मंदिराची रंगरंगोटी झाली. भाविकांच्या सोयीसाठी गणेश मंदिर ट्रस्टतर्फे कायमस्वरूपी स्टॉल लावून पुजेचे सर्व साहित्य, लॉकेट, कॅलेंडर आदी साहित्य उपलब्ध करण्याचा व मंदिर परिसरात ट्रस्टमार्फत भाविकांसाठी निवार्‍याची व्यवस्था,निण्याच्या पाण्याची व्यवस्था,पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी शहादा आगारातर्फे शहादा ते जयनगर (मोहिदा, कहाटूळ मार्गाने) जादा बसची व्यवस्था केली आहे. सारंगखेडा पोलिस ठाण्यचे पोलरस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त राहिल, गर्दी उसळते म्हणून ग्रामस्थ, विद्यार्थी, मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. ट्रस्टतर्फे मंदिर व परिसरातील स्वच्छतेसाठी व्यवस्था केली आहे.जयनगर हे शहाद्यापासून १५ किमी अंतरावर तर शिरपूरकडून वडाळी मार्गे जयनगरला पोहचता येते. मध्यप्रदेशातून शहादा, मंदाणे, असलोद मार्गेही जयनगरला पोहचता येते.यात्रे निमित्त सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, सरपंच मिनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनिल माळी, व सर्व ग्रामस्थ जयनगर यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!