जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये लष्कराच्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू काश्मीरमध्ये स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी), १८३ सीआरपीएफ बटालियन आणि ५० राष्ट्रीय रायफल्स यांनी संयुक्तपणे कारवाई करत लष्कर-ए-तोयबाच्या तीन  दहशतवाद्यांचा खात्मा केला.

गुरुवारी पहाटे भारतीय जवानांनी पुलवामा जिल्ह्यातील काकापोरामध्ये कारवाई करत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काल (बुधवारी) संध्याकाळी ६ वाजल्यापासून संघर्ष सुरु होता. यानंतर लष्कराने परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे ऑपरेशन सुरु झाले. पहाटे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर हे ऑपरेशन संपल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.

माजीद मीर, शरिक अहमद आणि इर्शाद अहमद अशी या तीन दहशतवाद्यांची नावे असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

LEAVE A REPLY

*