जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला

0

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील सुम्बल येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर आज (सोमवारी) पहाटे 4 वाजता दहशतवादी हल्ला झाला.

सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

सीआरपीएफच्या 45 बटालियनच्या कॅम्पवर हा हल्ला झाला आहे.

दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याच्या इराद्याने कॅम्पमध्ये घुसले होते.

LEAVE A REPLY

*