जबरदस्तीने रंग लावत विनयभंग

0

नाशिक । खरेदीसाठी दुकानात गेलेल्या तरूणीस एकाने जबरदस्तीने रंग लावत तीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि.17) सायंकाळी श्रमिकनगर येथे घडली. याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयीतास अटक केले आहे.

बाळा उर्फ रोहित मेहंदळे (29 रा.हनुमान मंदिराजवळ, श्रमीकनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रंगपंचमी निमित्त मेहंदळे हा परिसरातील एका दुकानात शिरला होता. दुकानात असलेल्या मायलेकींना रंग लावण्यासाठी गेलेल्या संशयीताने तरूणीचा विनयभंग केला.

ही घटना लक्षात येताच तरूणीच्या आईने जाब विचारला असता संशयीतांने मायलेकींना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तरूणीच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

संशयीतास अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*