जन्मभूमीतला सत्कार आयुष्यातील ठेवा – व्हाईस ऍडमिरल सुनील भोकरे

0

गुढे, ता.भडगाव |  वार्ताहर : येथील सुपुत्र सुनील वसंतराव भोकरे यांची भारतीय नौदलच्या व्हाईस ऍडमिरलपदी नियुक्ती झाले. म्हणून त्यांचा पहिला नागरी सत्कार त्यांचे मूळगाव गुढे येथे गुढीपाडव्याला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.

अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष बेलगंगा कारखान्याचे माजी चेअरमन कृष्णराव पाटील होते.

 

सत्कारमूर्ती सुनील भोकरे यांनी मनोगतात सांगीतले की, गावाने जो सन्मान व सत्कार केला तो आयुष्यभर विसरु शकणार नाही. हा जीवनातला सर्वात मोठा सन्मान आहे. नौसेनेत अनेक सन्मान झालेत पण जन्मभूमीतला सन्मान, गौरव कधीच विसरु शकणार नाही, असे भावोद्गार सुनील भोकरे यांनी व्यक्त करुन जन्मभर मातृभूमीचा ऋणी राहील, असे सांगून त्यांनी बालपणाच्या हितगुजांची शिदोरी या मातीतून मिळविली असल्याचे सांगितले. याचबरोबर बालपण, शिक्षण, सैनिकी शिक्षण, नोकरी, बढती असा सर्व जीवनपट उलगडून तरुणांनी नौसेनेत सामील होण्याचे आवाहन केले.

सुनील भोकरे यांची गावांतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी सुनील भोकरे यांचे औक्षण करण्यात आले. त्यांनी भोकरे परिवाराला भेट दिली.

त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतपद्य कु.स्नेहल सापनेर हिच्या मधूर स्वरगिताने झाली. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन, सरस्वतीपूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नागरी सत्कार समिती गुढे, मेडीकल असोसिएशन चाळीसगाव, समस्त तेली समाज मंडळ, पंडीत दीनदयाळ शिक्षण संस्था, समस्त भोकरे परिवार, युवामंच यांच्यावतीने सुनील भोकरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सुनील भोकरे यांनी जिल्हाधिकारी व गुढे येथील वाचनालयास पुस्तके भेट दिले व त्यांना दिलेले सन्मानपत्र येथील आश्रमशाळेस भेट दिले.

भोकरे परिवाराच्यावतीने डॉ.शुभांगी भोकरे यांनी आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सत्कारमूर्ती सुनील भोकरे यांचे वडील वसंतराव भोकरे, बेलगंगा कारखान्याचे माजी चेअरमन कृष्णराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आ.किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी जि.प.सदस्य विकास पाटील, भडगाव पं.स.सभापती हेमलता पाटील, चाळीसगाव पं.स. सभापती स्मितल बोरसे, भडगाव नगराध्यक्ष श्याम भोसले, जि.प.सदस्य भूषण पाटील, पं.स.सदस्य रामकृष्ण पाटील, जिल्हा दूध संघ संचालक प्रमोद पाटील, नगरसेविका योजना पाटील, माजी नगरसेवक महेंद्रसिंग पाटील, उद्धव माळी, संजय पाटील (बात्सर) शेतकी संघ संचालक संजय पाटील, सरपंच प्रतिभा माळी, सोसायटी चेअरमन यशवंत पाटील माजी चेअरमन हिरामण चौधरी, राजेंद्र पाटील, माजी सरपंच सतीश पाटील, तहसीलदार सी.एम.वाघ, पोलीस निरीक्षक डी.के.निकम, शेतकी संघाचे माजी चेअरमन एकनाथ माळी, जिल्हा कृषी अधिकारी अनिल भोकरे, बापूराव पाटील, प्रदीप पाटील, रा.कॉं.तालुकाध्यक्ष व्ही.एस.पाटील, द्वारकानाथ भोकरे, बाळकृष्ण भोकरे, रवींद्र भोकरे, डॉ.अनिल भोकरे, उमेश भोकरे, राजेंद्र भोकरे, डॉ.प्रवीण भोकरे, मिलींद भोकरे, स्वप्निल भोकरे, पीयूष भोकरे, डॉ.प्रवीण भोकरे, ग्रा.पं.व सोसायटीचे आजी पदाधिकारी, ग्रामस्थ तलाठी सागर बागुल ग्रामसेवक राठोड, समस्त भोकरे परिवार आदी ग्रामस्थ तरुणवर्ग परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्ताविक योगेश भोकरे यांनी तर सूत्रसंचालन शालीग्राम निकम आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*