‘जनावरांच्या वेदना समजून घ्या’ : सनी लिओनी

0
अभिनेत्री सनी लिओनीने जनावरांसाठी काम करणा-या पेटा संस्थेसोबत मिळून एक कॅलेंडर लाँच केले आहे.
कॅलेंडर लाँच केल्यानंतर सनीने शाकाहार का स्वीकारला आणि त्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात कसे बदल झाले, याचा अनुभवही तिने सर्वांसमोर मांडला.
सनी लिओनीने सांगितले की, मला भेटणारे कित्येक जण विचारतात की शाकाहारी होणं कठीण आहे का?, तर मी उत्तर देते की शाकाहार स्वीकारणं खूपच सोपे आहे.
”शाकाहार स्वीकारल्यानंतर वजन घटलं”
सनी पुढे असंही म्हणाली की, खरं तर वजन घटवण्यासाठी शाकाहार स्वीकारला नव्हता. मात्र शाकाहाराचा फायदा वजन घटवण्याच्या स्वरुपात मिळाला. शिवाय, शरीरात अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असल्याचंही जाणवले.
”जनावरांच्या वेदना समजून घ्या”
जर तुम्हाला शाकाहारी व्हायचे असेल तर तुम्ही मांसाहारांचा शिकार होणा-या जनावरांच्या वेदना दाखवणारे व्हिडीओ पाहिले पाहिजेत, असे सांगत सनीनं जनावरांप्रती आपलं प्रेम व्यक्त केले.
दरम्यान, सनी लिओनीला गेल्या वर्षी ”पेटा पर्सन ऑफ द इअर” अवॉर्ड देऊन गौरवण्यातही आले आहे.

LEAVE A REPLY

*