जऊळके येथे अरुंद पुलामुळे कार नदीपात्रात कोसळली

0

वणी : पिंपळगाव महामार्गावर जऊळकेवणी येथील नदीवरील अरुंद पुलामुळे रात्रीच्या सुमारास रस्त्याच अंदाज न आल्यामुळे (एम एच ४१ व्ही ८१३९) मारुती स्विफ्ट कार  पुलावरून घसरल्याने कारचालक जखमी होऊन सुदैवाने प्राण वाचले

वणी-पिंपळगाव महामार्गावर अनेक दुर्घटना घडत असतांना स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन करत असूनही यावर कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानेबुधवार (१ मार्च)रोजी जऊळके -वणी येथील पुलावरून मारुती स्विफ्ट कार कोसळून दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली.

पुलाच्या दोन्ही बाजूची संरक्षण भिंत पडलेल्या अवस्थेत असून सुरक्षा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही आता या घटनेनंतरतरी सार्वजनिक बांधकाम विभागाणे संरक्षण कडे बांधून पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*