छात्रभारतीचे आंदोलन 15 ऑगस्टपर्यंत स्थगित

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अकरावी व बारवी प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या निषेधार्थ छात्रभारती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या परिसरात गेट बंद करून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र शिक्षणधिकार्‍यांनी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. या चर्चेमधून या प्रवेश प्रक्रियेची सर्व चौकशी करून 15 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा. या चौकशीदरम्यान छात्रभारती संघटनेच्या एका प्रतिनिधीच्या उपस्थितीत ही चौकशी केली जाणार आहे. तसे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेचे रवींद्र गुंजाळ यांनी सांगितले.
अकरावी व बारवी प्रवेश प्रक्रियेत शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत गैरप्रकार होत असल्याची तक्रार छत्रभारती संघटनेच्या वतीने शिक्षणधिकार्‍यांकडे छात्रभारती विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज मोफत देण्यात यावे, पैसे भरल्याची पावती त्याच दिवशी द्यावी, बारवीमधील मुलींना मोफत शिक्षण आहे. त्यांच्याकडून पैसे घेऊ नये, विद्यार्थी संख्यपेक्षा जास्त प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच जादा तास उन्हाळी वर्ग शिबिर यातून आर्थिक शोषण केलेल्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच 11 वी व 12 प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय चौकशी समिती तयार करावी, अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

*