छत्रपती इंजिनिअरिंगमध्ये चित्रपट ऑडिशनला प्रतिसाद

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे गुरूवारी (दि.03) रोजी विद्यार्थी व कर्मचार्‍यांसाठी राजयोग फिल्म व प्रोडक्शन निर्मित ‘कहर’ या मराठी चित्रपटासाठी ऑडिशन्स पार पडले.
प्राचार्य डॉ.आर. एस. देशपांडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण करकरे, मुख्य कलाकार शेखर भिसे, गायक दत्ता गुंजाळ, समन्वयक संतोष धुमाळ, कॅमेरामन अतुल वाघमारे यांना महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ऑडिशन्सच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले होते. दिग्दर्शक करकरे यांनी कहर चित्रपटाचा विषय व पार्श्‍वभूमी सांगितली. पर्यावरण वाचवा हा अत्यंत महत्वाचा संदेश देणारा चित्रपट असून, ग्रामीण भागात त्याचे चित्रिकरण केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण, संगीत दिग्दर्शन, नृत्य, पटकथा लेखन आदी सुप्त गुण दडलेले असतात. ऑडिशन टिमने विद्यार्थ्यांनी सादर केलेली कलाकृती याचे काळजीपूर्वक निरिक्षण केले. ऑडिशन्समध्ये 200 विद्यार्थी व विद्यार्थीनींनीपैकी प्राथमिक फेरीमध्ये 30 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील वातावरण व हिरवाईने नटलेला परिसर याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
ऑडिशन्ससाठी इच्छुक कलाकारास 5 ते 7 मिनिटांचा अवधी दिला गेला. या वेळेत विद्यार्थ्यांने डायलॉग, डान्स, गाणे म्हणणे, भाषण आदी अंगभूत कलेचा नमुना ऑडिशन टिमसमोर सादर केला. हे ऑडिशन पूर्णपणे मोफत होते व विद्यार्थी व स्टाफ यांनी आपल्या तासिका सांभाळून यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. एस. देषपांडे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, प्रत्येक व्यक्तिमध्ये एक कलाकार दडलेला असतो. त्या कलाकाराला सर्वांसमोर ठेवण्याची एक उत्तम संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. प्रसंगी यंत्र विभागप्रमुख प्रा. एम.पी. नगरकर यांनी आभार प्रदर्षन केले.

LEAVE A REPLY

*