छत्तीसगडमध्ये ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ टॅक्स फ्री!

0

भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून छत्तीसगड सरकारने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री डॉ. रमन सिंग यांनी घेतला आहे.

तरुणांना सचिनच्या जीवनचरित्रातून प्रेरणा मिळेल या हेतून हा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच छत्तीसगड सरकारने हा निर्णय घेऊन एक नवा पायंडा पाडला आहे. महाराष्ट्र सरकारची जबाबदारी या निर्णयामुळे वाढली आहे.

सचिन तेंडूलकर हा जगभरातील क्रिकेट रसिकांचा चाहता असला तरी तो मुळचा मुंबईकर आणि मराठमोळा आहे. छत्तीसगड सरकार ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाला टॅक्स फ्री करीत असेल तर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार ? असा सवाल उपस्थित होऊ शकतो.

LEAVE A REPLY

*