Type to search

क्रीडा

चौथ्या क्रमांकासाठी राहुल योग्य – वेंगसरकर

Share
मुंबई । क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस उरले आहेत. भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवावे याबाबत अजून निर्णय झालेला नाही. विश्वचषकाठी चौथ्या क्रमांकावर केएल राहुलला खेळवले जाऊ शकते. असे मत माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये प्रतिकूल परिस्थितीत के. एल राहूला खेळण्याची जाण आहे. तसेच त्याच्यात विदेशी खेळपट्टीवर खेळण्याचा उत्साह वाखण्याजोगा आहे. राहुल चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे वेंगसरकर म्हणाले. टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकमध्ये सहजपणे सेमीफायनलमध्ये पोहचेल असा विश्वास वेंगसरकरांना आहे. तर त्यानंतर टीम इंडियाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे देखील ते म्हणाले. आपल्याकडे शिखर धवन- रोहित शर्मा सारखी इन-फॉर्म ओपनर जोडी आहे. कर्णधार कोहली तिसर्‍या क्रमांकासाठी योग्य आहे असे वेंगसरकरांचे मत आहे. केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. राहुलची खेळण्याची पद्धत उत्तम आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाजज हा पारंगत असायला हवा. असे देखील वेंगसरकर म्हणाले.

विश्वचषक स्पर्धेदरम्यान सपाट खेळपट्ट्या असण्याची शक्यता आहे. परंतु राहुलच्या खेळण्याची पद्धत टीम इंडियासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वेंगसरकरांनी व्यक्त केला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल दुसर्‍या क्रमांकावर होता. त्याने एकूण 593 धावा केल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!