चोळकेवाडीत बिबट्या विहीरीत पडला

0

अस्तगाव (वार्ताहर)– येथील चोळकेवाडी शिवारातील एका शेतकर्‍याच्या विहीरीत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या गुुरुवारी मध्यरात्री विहीरीत पडला.

 
चोळकेवाडीतील जगन्नाथ किसन पांडागळे यांच्या विहीरीत एक अडीच ते तीन वर्ष वयाचा बिबट्या गुरुवारी रात्री विहीरीत पडला. श्री. पांडागळे यांच्या या विहीरीला पाणी असल्याने हा बिबट्या विहीरीच्या कठाडाला धरुन रात्रभर होता. शुक्रवारी दुपारी या विहीरी लगत पांडागळे यांचे कांदे काढण्याचे काम सुरु होते. विज नसल्याने विज पंप सुरु होणार नसल्याने जगन्नाथ पांडागळे यांनी कांदे काढणार्‍या महिलांसाठी बादली विहीरीत सोडली. त्यावेळी त्यांच्या लक्षात विहीरीत बिबट्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकाराची माहिती चोळकेवाडीचे पोलिस पाटील प्रदिप चोळके यांना दिली.

 

त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क केला. दुपारी चार वाजता वनसेवक श्री. सुरासे हे दाखल झाले. त्यांनी गणपत पांडांगळे, राजेंद्र चोळके, मच्छिंंद्र चोळके, विलास चोळके या शेतकर्‍यांच्या मदतीने बाज विहीरीत सोडली. या बाजेवर बिबट्याने उडी मारली. व विहीरीतील ठेवणाचा आधार घेतला. आज शनिवारी सकाळी त्याला बाहेर काढण्यात येणार आहे. के्रन तसेच पिंंजरा यासाठी आणण्यात येणार आहे. असे श्री. सुरासे यांनी सांगितले.

 
दरम्यान अस्तगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासुन बिबट्यांचे वास्तव्य आहे. ते काही दिवस अन्यत्र जातात व पुन्हा परततात. एका मादीसह दोन अडीच वर्ष वयाच्या बिबट्यांचा वावर या परिसरात आहे. त्यांनी चोळकेवाडी, अस्तगाव परिसरातील अनेक कुत्रे फस्त केले आहेत. या शिवाय शेळ्या, कालवडी यांचाही फडशा पाडला आहे. होळीच्या दिवशी येथील योग प्रशिक्षक प्रा.संजय चोळके हे त्यांच्या शेताजवळुन जात असतांने त्यांच्या दुचाकी मागे हा बिबट्या लागला होता. असे त्यांनी सांगितले. चोळकेवाडी परिसर विशेषत: शेतकरी धास्तावलेले आहेत. या बिबट्यांना जेरबंद करुन त्यांना शेकडो किमी अंतरावरील जंगलात सोडावे, अशी मागणी येथील रहिवाश्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*