Type to search

क्रीडा

चेन्नईची विजयी सुरुवात

Share
चेन्नई । गतविजेच्या चेन्नई सुपकिंग्ज संघाने बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर 7 गडी राखून मात करत चेन्नईने पहिला विजय मिळवला आहे. बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान चेन्नईच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. शेन वॉटसन आणि सुरेश रैना या फलंदाजांना माघारी धाडण्यात बंगळुरुच्या गोलंदाजांना यश आलं. मात्र त्यानंतर अंबाती रायुडू, केदार जाधव आणि रविंद्र जाडेजाने संयमी फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी हरभजन सिंह, इम्रान ताहीर आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंच्या जोरावर पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला 70 धावांमध्ये रोखण्यात चेन्नईचा संघ यशस्वी झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला.

बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल हे फलंदाज सलामीला आले. दोघांनीही बंगळुरुच्या डावाची सावध सुरुवात केली. मात्र झटपट धावा जमवणं दोघांनाही जमलं नाही. अखेर हरभजनसिंहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली रविंद्र जाडेजाकडे झेल देऊन माघारी परतला.

यानंतर बंगळुरुच्या डावाची घसरगुंडी उडाली. कोहली माघारी परतल्यानंतर मोईन अली, एबी डिव्हीलियर्स आणि शेमरॉन हेटमायर हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. बंगळुरु आयपीएलमधील सर्वातत निचांकी धावसंख्या नोंदवणार अशी भीती वाटत असताना सलामीवीर पार्थिव पटेलने तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन संघावरची नामुष्की टाळली.

पार्थिवने संघाकडून सर्वाधिक 29 धावा पटकावल्या. चेन्नईकडून हरभजन सिंह, इम्रान ताहीरने प्रत्येकी 3-3, रविंद्र जाडेजाने 2 तर ड्वेन ब्राव्होने 1 बळी घेतला. बंगळुरुचा एक फलंदाज धावबाद झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!